जळगावात लग्नाच्या आमिषाने तरुणीवर पाच वर्ष बलात्कार


जळगाव : 28 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने एकाने सलग 5 वर्ष बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परजिल्हयातील एक तरूणी नोकरीनिमित्ताने जळगाव शहरातील एका भागात वास्तव्यास असून या तरुणीच्या संपर्कात संपत लक्ष्मण मल्हाड (दरीबडची, ता.जत, जि.सांगली) हा संपर्कात आल्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष देत तसेच जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना सन 2016 ते 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली. तरुणीने सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून संपत मल्हाड या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !