अखेरच्या माणसापर्यंत लसीकरण हेच भाजपाचे धोरण : खासदार रक्षा खडसे
वरणगाव : शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा समर्पण सप्ताह व माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण महाशिबिर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली श्री गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात झाले. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात तीन हजार लस खासदार रक्षा खडसे यांनी उपलब्ध करून दिल्याने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा जन्म दिवस व त्यातच रविवारी सुटीचा दिवस असल्यावर सुद्धा शिबिर घेण्यात आले.प्रत्येक शहरातील एकूण एक नागरीकांपर्यंत लस पोहचली पाहिजे, अशी इच्छा व संकल्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. तो भाजपाचे कार्यकर्ते मेहनत घेऊन करता आहे याचा मला अभिमान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वा व्यक्तींना केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या योजनेचा लाभ हा पोहोचला पाहिजे याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी शिबिरप्रसंगी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी हाजी अलाउद्दीन शेठ, कामगार नेते मिलिंद मेढे, अॅड.ए.जी.जंजाळे, सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, गोलू राणे, नटराज चौधरी, अभियान प्रमुख आकाश निमकर, पप्पू ठाकरे, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, प्रशांत मोरे, कमलाकर मराठे, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भाई, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, जिल्हा जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक, वरणगाव शहराध्यक्ष डी.के.खाटीक, किरण धुंदे, योगेश माळी, गजानन वंजारी, डॉ.प्रवीण चांदणे, संदीप माळी, कृष्णा माळी, प्रताप दिव्यवीर, मुस्लिम भाई अन्सारी, रमेश पालवे, माजी सरपंच सुभाष धनगर, ज्ञानेश्वर घाटोळे, प्रणिता चौधरी, शहराध्यक्ष महिला मोर्चा अनिल वंजारी, अरुण बावणे, अझर उल्ला शेख, फहिम जावेद शहा, छोटू सेवातकर, रॉक कश्यप, राहुल जंजाळे, विशाल कुंभार, अंकुश साबळे यांच्यासह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



