रावेरात गोठा योजना व पाणीपुरवठा अपहारावरून अधिकारी फैलावर
महापुरुषांच्या अनादर प्रकरणी कारवाई होणार : रावेरात आमदार पाटील
रावेर : पैसा काढला पण गोठा नाही तसेच पाणीपुरवठा योजनांचा अपहार, ई टेंडर घोटाळा, वैयक्तीक लाभाच्या योजना अनियमतेचा वस्तुनिष्ट अहवाल तत्काळ देण्याचे निर्देश समितीने समितीने गटविकास अधिकारी यांना दिल्याची माहिती समिती प्रमुख आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. रावेर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचा अनादर झाल्याने बुधवारच्या रावेर गटशिक्षणाधिकार्यांवर कारवाई करण्याचे सुतोवाच समितीने येथे केले.
विविध योजनांची केली पडताळणी
तीन सदस्य पंचायत राज समिती मंगळवारी सायंकाळी सहा वाजता रावेर पंचायत समितीला भेट दिली. तत्पूर्वी पंचायत राज समितीने रावेर तालुक्यातील पाल येथील ग्रामपंचायतीला भेट दिली व घरकुलांची पाहणी केली. रावेर पंचायत समितीच्या हॉलमध्ये पंचायत राज समितीने तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांच्या योजनेची पडताळणी केली. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. समितीचे प्रशासनातर्फे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी स्वागत केले.



पंचायत राज समितीत यांचा होता सहभाग
रावेर पंचायत समितीत आढावा घेण्यासाठी आलेल्या आमदारांच्या समेतीत गट प्रमुख आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर), आमदार माधवराव जवळगावकर (नांदेड), आमदार डॉ.देवराव होळी (गडचिरोली) यांचा सामवेश होता. समितीसोबत विधान मंडळ अधिकारी शशिकांत साखरकर (मुंबई), जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, प्रतिवेदक मैत्रीय कुलकर्णी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकार्यांवर कारवाईचं संकेत
रावेर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात झालेल्या महापुरुषांच्या अनादर प्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई संदर्भात जिल्हास्तरावर बुधवारी होणार्या सीईओंच्या आढावा बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे पंचायत राज समिती सदस्य अनिल भाईदास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीची कारवाईची मागणी
रावेरात पंचायत राज समिती दाखल होताच माजी आमदार अरुण पाटील यांच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी व निळे निशाण सामाजिक संघटनेचे आनंद बाविस्कर तसेच साने गुरुजीचे विचारक प्रशांत बोरकर यांनी महापुरुषांचा अनादर प्रकरणात गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मागणी केली.
