ज्येष्ठ नागरीकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत : ज्येष्ठ नागरीक समन्वय व सनियंत्रण समितीची सभा

जळगाव : प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरीक महत्वाचे सदस्य आहेत. ज्येष्ठ नागरीकांच्या सुदृढ स्वास्थासाठी येत्या ज्येष्ठ नागरीक दिनी अर्थात 1 ऑक्टोबर, 2021 रोजी ज्येष्ठ नागरिकांचे कोविड-19 लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरीक समन्वय व सनियंत्रण समितीची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरीक कुटुंबाचा आधार
जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, ज्येष्ठ नागरीक कुटुंबासाठी आधार असतात. त्यांच्या अनुभवाचा कुटुंबीयांनी लाभ घेतला पाहिजे. तसेच ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करावे. या दिवशी जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी कोविड – 19 चे लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पाटील यांनी ज्येष्ठ नागरीक अधिनियमाविषयीची माहिती बैठकीत दिली


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !