रेस्टॉरंटमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे लागली आग
जळगाव : शहरातील मू.जे.महाविद्यालयाजवळील एका रेस्टॉरंटमधील फ्रीज कॉम्प्रेसरला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. महापालिकेच्या अग्निशामन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणली. शहरातील मू. जे. महाविद्यालयाजवळ पॉपीलॉन रेस्ट्रॉरंट असून बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे अचानक रेस्टॉरंटमधील फ्रिजच्या कॉम्प्रेसरला अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने याठिकाणाहून मोठया प्रमाणात धूर निघत होता. दरम्यान आगीची माहिती मिळताच महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाचे प्रकाश चव्हाण, गंगाधर कोळी, सोपान पाटील, नितीन बारी यांनी लागलीच घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आणली. आगीत फ्रिजसह रेस्टॉरंटमधील काही वस्तू जळून खाक झाल्या.

