पत्नीला भेटायला बोलावून पतीने आवळला गळा
नाशिक : पतीने पत्नीला भेटायला बोलावून गळा दाबून पत्नीचा खून केला. नाशिकरोड येथील हॉटेलमध्ये ही घटना घडली. पत्नीचा खून केल्यानंतर हॉटेल मधून बाहेर पडणार्या पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पॉईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सासरी राहणार्या ज्योती पोपट वीर व पती पोपट वीर यांच्यात वाद सुरू होता. त्या कारणावरुन ज्योती या जेलरोड भागातील त्यांच्या माहेरी काही दिवसांपूर्वी आलेल्या होत्या. पती पोपट याने पत्नी ज्योतीला मंगळवारी सायंकाळी नाशिकरोडच्या बिटको पॉईंट येथील पवन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा खटके उडाल्याने रुममध्येच पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर महिलेचा पती संशयित पोपट हा पसार होण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
यांच्या पथकाकडून आरोपीला अटक
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित पोपटला ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश न्याहळदे, गुन्हे शोध पथकातील कर्मचारी व अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
