गुड न्यूज : सलग तिसऱ्यांदा गिरणा धरण भरले
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा
चाळीसगाव : चाळीसगावसह तीन तालुक्यांची व जळगाव जिल्ह्यातील काही गावांची तहान भागवणारे गिरणा धरण सलग तिसऱ्यांदा भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. गिरणा धरणावरील केळझर, हरणबारी, चणकापूर, ठेंगोडा धरण भरल्याने गिरणा धरणाच्या जलपातळीत जलपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी पहाटे गिरणा धरण शंभर टक्के भरले असून धरणात 21 हजार 500 द.ल.घ. फु.इतका जलसाठा आहे त्यातील 3 हजार द.ल.घ.फु मृत आहे. उगमस्थानावर सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने गिरणा धरणातुन देखील नदीपात्रात क्यूसेस 20 हजार पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गिरणा काठावरील सायगाव, पिलखोड, नांद्रे, मेहुणबारा, उपखेड , बहाळ , भडगाव गिरणा काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. गिरणा धरणातून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, मालेगाव, जळगाव शहर, नांदगाव परीसराला पाणीपुरवठा होतो.

मन्याड धरण ही ओसंडून वाहू लागले
गिरणा व मन्याड धरणाच्या उगमस्थानावरदेखील पावसाने कहर केला आहे. मन्याड धरण ओसंडून वाहू लागल्याने गिरणा नदीत 20 हजार क्यूसेसपाण्याचा विसर्ग सुरू आहे.

