शिपायाला कॅशियर करण्याचे परीणाम ! : शिवपुरी सहकारी बँकेत 103 कोटींचा घोटाळा


नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या शिवपुरी सहकारी बँकेत 103 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. यापैकी अधिकांश रक्कम ही कॅशियर नटवरलाल राकेश पाराशरने गायब केली असून या घोटाळ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्याचा सूत्रधार हा कॅशिअर पाराशर हा आहे. तो याच बँकेत शिपाई होता, त्याला कॅशिअर बनविण्यात आले होते. त्यानेच एवढा मोठा घोटाळा केला आहे. सहकारी बँकेमध्ये अफरातफर केल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर भोपाळमध्ये 13 सदस्यांची समिती चौकशी करत आहे. आतापर्यंत तीन आरोपींकडून पाच कोटी 31 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अद्याप सर्व घोटाळा बाहेर आलेला नाही. या घोटाळ्याची व्याप्ती वाढू लागली आहे. आतापर्यंत शिवपूरी जिल्ह्यातील तीन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली असून पाराशरसह अन्य घोटाळेबाज कुटुंबीयांसह बेपत्ता झाले आहेत. घोटाळ्याचा मास्टरमाईंड राकेश पराशरला पकडणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. कारण तो कुटुंबासह घरातून गायब झाला आहे. त्याच्या अटकेनंतरच या मोठ्या घोटाळ्याचे धागेदोरे उघड होतील. तो दुसर्‍या राज्यात गेल्याचे बोलले जात आहे.

आरोपीचे उद्योग-व्यवसाय मात्र पूर्ववत
राकेश गायब असला तरी त्याचे जिल्हाभरात पसरलेले उद्योग व्यवसाय आजही सुरू आहेत. हे पैसे त्याने व्यवसायांमध्ये लावले असण्याची शक्यता आहे. त्यातून येणारा पैसा पराशरच्या खात्यात त्याचा नोकर जमा करतो. पाराशरच्या मुलाची गाडी काही दिवसांपूर्वी मथुरा ते वृंदावन रस्त्यावर बंद पडली होती. तेव्हा त्याच्याकडे दुरुस्तीचे पैसे कमी पडले. तर त्याच्या दुकानात काम करणार्‍या एका कामगाराने त्याच्या खात्यात 20 हजार हजार रुपये भरले. पोलीस अद्याप या लोकांची कॉल डिटेल्स तपासू न शकल्याने तपास अडकला आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !