भुसावळातील पुरात अडकलेल्या म्हशीला जीवनदान


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती दलातील भुसावळ जीवरक्षक दलाची धाडसी कामगिरी

भुसावळ : तापी नदीपात्रातील पुरात अडकलेल्या म्हशीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती दलातील जीवरक्षकांनी जीवदान दिल्याने या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेे , अर्जुना संस्थेचे प्रशिक्षित जीवरक्षक पथक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिह रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली तापी नदी पात्रात मधोमध पुलाखाली पुराच्या पाण्यात म्हैस अडकल्याची माहिती कळताच संस्थेचे माजी उपाध्यक्ष सतीश कांबळे व सहकार्‍यांनी धाव घेतली.

मूळ म्हशी मालकाचाही लागला शोध
जीवरक्षक स्कायलेब डिसुझा, आशिश अलोटकर, रोहित श्रीवास्तव, एलेंन मेसन व तापी काठावरील मासेमार बांधवांना सोबत घेऊन धाडसाने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडत म्हशीला वाचवण्यात आले. म्हशीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर काही पशूपालकांनी मालकी हक्काचा दावा केला. सर्पमित्र सतीश कांबळे यांनी तपास केला असता पिंप्रीसेकम गावातील सदरील वगार पाणी पिण्यास नदीकाठावर आली असता नदीच्या पुरात वाहिल्याचे कळाले. पोलिसांच्या परवानगीने बचावकर्ते डिसुजा यांच्या ताब्यात देण्यात आले असून खरा मालक आल्यावर ओळख पटवून त्याच्या ताब्यात म्हशीला सोपवण्यात येईल, असे स्कायलेब डिसुझा म्हणाले. पथकातील सदस्य वेळेवर पोहोचल्यानंतर मुक्या प्राण्याचे प्राण वाचल्याचे समाधान असल्याचे जीवरक्षक सतीश कांबळे म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !