रावेर पुरवठा निरीक्षकांच्या ताळेबंद दालनाला दिव्यांग बांधवांनी घातला हार


अनोख्या गांधीगिरी आंदोलनाची रावेर तालुक्यात चर्चा

रावेर : रावेर तहसीलचे पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांच्या कुलूप लावलेल्या कार्यालयाला दिव्यांग बांधवांनी प्रवेशद्वाराला हार बांधून गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केल्याने शहरात या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली. पुरवठा नेहमीच नेहमीच अपमास्पद वागणूक देऊन दिव्यांग बांधवांना फिरवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनामुळे तहसीलची प्रतिमा मलीन झाल्याची चर्चा रंगली.

गांधीगिरी आंदोलनाची सर्वदूर चर्चा
दिव्यांग बांधवांनी रावेर तहसीलमध्ये पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांच्या कुलूपबंद कार्यालयाला हार टाकून गांधीगिरी पध्दतीने गुरुवारी आंदोलन केले. रावेर पुरवठा निरीक्षक दिव्यांग बांधवांची फिरवा-फिरव करतात, शिवाय त्यांना रेशन कार्ड देण्यासाठी अडवणूक करतात त्यामुळे तालुभरातील दिव्यांग बांधवांची भटकंती होत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष रजनीकांत शामराव बारी, शहराध्यक्ष महेश महाजन, ब्रिजलाल पाटील, पवन शिरनामे, प्रदीप परदेशी आदी दिव्यांग बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.




पुरवठा निरीक्षक मानसिक त्रास देत असल्याचा आरोप
तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय कार्डात सामील करण्यासाठी 2018 पासून तहसीलदार कार्यालयात वेळोवेळी निवेदन देण्यात आले मात्र दोन महिन्यांपासून रेशन कार्डासाठी फिरवले जात आहे. दिव्यांग बांधवांना आज करतो, उद्या करतो म्हणत भटकंती करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न पुरवठा कार्यालयाकडून फिरवले जात असल्याने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आल्याचे रजनीकांत बारी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !