वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या पथकातील अधिकारी-कर्मचार्‍यांवर जमावाचा हल्ला


खामगाव : वीज बिल वसुली गेलेल्या महावितरणाच्या पथकाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी धोबी खदान भागात खामगावात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जमावाविरोधात गुन्हा
महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचार्‍यांना हल्ला करण्यात आल्याने विद्युत विभागाचे कर्मचारी शहर पोलीस स्टेशनमध्ये धडकले होते. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे आपल्या पथकासह शहरातील धोबी खदान परीसरात वीज बिल वसुलीसाठी गेले असता काही जणांनी वीज बिल भरण्यास असमर्थता दर्शवली. त्यावेळी संबंधितांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहिम राबविण्यात येत असताना धोबी खदान परीसरातील संतप्त जमावाने महावितरणच्या अधिकार्‍यांच्या पथकावर हल्ला चढविला कर्मचारी आणि अधिकार्‍यांना मारहाण केली. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मारहाण झाल्याचे समजतात खामगाव महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी शहर पोलीस स्टेशनमध्ये धडकले. या प्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी धोबी खदान भागातील जमावाविरोधात भादवि कलम 143, 147, 149, 353, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !