रावेरात कोल्ह्याच्या हल्ल्यात महिला जखमी : पुन्हा चार बकर्या केल्या फस्त
रावेर : तालुक्यातील अहिरवाडी येथे कोल्ह्याने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली तर चार पाळीवर बकर्यादेखील कोल्ह्याने फस्त केल्याची घटना गुरुवारी घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली. धुमाकुळ घालणारा कोल्हा ट्रॅप कॅमेर्यात येत नसल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, अहिरवाडी येथे घरात झोपलेली सगुणाबाई तायडे यांच्यावर कोल्ह्याने हल्ला केल्याने महिलेच्या डोळ्याच्या खाली मोठी दुखापत झाल्याने या परीसरात मोठी भीती निर्माण झाली आहे. ही घटना ताजी असताना गुरुवारी पुन्हा चार पाळीव बकर्या कोल्ह्याने फस्त केल्याने पशूपालकामंध्ये भीती पसरली आहे. वनविभागाने कोल्ह्याचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
