गिरणा नदीत वृद्धेचा बुडाल्याने मृत्यू


जळगाव : तालुक्यातील लमांजन येथील 68 वर्षीय वृद्धेचा गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. हिराबाई पाटील (68) असे मयताचे नाव आहे. हिराबाई या शुक्रवारी पहाटे पाच वाजता गिरणा नदीच्या काठावर गेल्या असता पाय घसरून त्या नदीत पडल्याचे सांगण्यात आले. सकाळी 7 वाजेपर्यंत हिराबाई पाटील ह्या घरी न आल्याने त्यांचा पुतण्या गोरख पाटील शोधण्यासाठी गिरणा नदीच्या काठावर आला. त्यावेळी त्यांना एका ठिकाणी बादली आणि चष्मा आढळला. घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. दोन तास शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह काटेर झुडूपात आढळून आला. याबाबत एमआयडीसी पोलीसांना माहिती देण्यात आली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, पुतणे असा परीवार आहे.

हरताळा शिवारातील शेतात वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !