न्हावी शिवारात गुरे चराईसाठी गेलेल्या प्रौढाचा वीज कोसळल्याने मृत्यू
फैजपूर : तालुक्यातील न्हावी शिवारात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. हमीद रूबाब तडवी (47, रा.न्हावी, ता.यावल) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार,हमीद तडवी हे न्हावी शिवारातील जानोरी जंगलात खारबर्डी धरणाच्या पाटचारीजवळ शुक्रवारी गुरे चराईसाठी गेल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहान लागल्याने पाटचारीत पाणी पीत असतांना त्यांच्या पायाजवळ वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या व्यक्तीने ओरडा-ओरड केल्याने परीसरातील शेतकरी व मजूर जमा झाले. त्यांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस हबीब तडवी यांच्या खबरीनुसार ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार राजेश बर्हाटे, श्रीकांत इंगळे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परीवार आहे.
यावल तालुक्यातील शेतकर्याचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू



