एटीएम फोडणारे त्रिकूट चोरी करतानाच पोलिसांच्या जाळ्यात
नागपूर : नागपूरातील भीमसेन चौकातील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडले जात असल्याची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. तीन आरोपी हातोडी, कटर आणि पेचकसच्या सहाय्याने एटीएम फोडून रक्कम काढण्याच्या तयारीत पोलिसांना दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. स्वप्नील रामचंद्र जांभुळकर (43, रा.खलाशी लाईन, मोहन नगर), प्रवीण नामदेवराव लव्हाले (43, रा.म्हाळगी नगर, हुडकेश्वर) आणि आकाश धर्मेंद्र नाईक (46, खलाशी लाईन, सदर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून कटर, मशीन, पेंचीस, चाकू, बॅग जप्त केली. त्यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाणे कलम 379,511,427,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहा.पोलीस निरीक्षक विलास मोटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे केली.

