मुलीची छेड काढण्यावरून जळगावात दोन गटात तुंबळ हाणामारी
जळगाव : शहरातील हरी विठ्ठल नगर जवळील खंडेराव नगर भागात असलेल्या आझाद नगर भागात शनिवारी मुलीची छेड काढण्यावरून रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. शहरातील हरिविठ्ठल नगर परीसरात असलेल्या खंडेराव नगरातील आजाद नगर भागात शनिवार, 2 ऑक्टोबर रोजी बाजार असल्यामुळे बाजारात आलेल्या मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास मुलीची छेड काढण्याच्या जाब विचारण्याच्या कारणावरुन कशामुळे गटाने पहिल्या गटाला मारहाण केल्यावरून हा वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि काही वेळातच दगडफेक करण्यात आली. या वादात वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि क्यूआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत एक जण जखमी झाल्याचे समोर आले.