सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात


बारामती : 30 हजाराची लाच स्वीकारताना बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत एसीबीच्या पथकाने पकडताच पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिपान अभिमान माळी (56) असे अटकेतील अधिकार्‍याचे नाव आहे. ते बारामती शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. या प्रकरणी एका 42 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. संशयीत माळी यांनी गुन्ह्याचे चार्जशीट तक्रारदाराच्या बाजूने पाठवण्यासाठी 40 हजाराची मागणी केली मात्र तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार रविवारी 30 हजाराची लाच स्वीकारतांना माळी यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलीस निरीक्षक भारत साळुंके, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, भूषण ठाकुर,चंद्रकांत कदम आदीच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !