28 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या
जळगाव : शहरातील शनीपेठ परीसरातील दिनकरनगरातील मोहन टॉकीजजवळील रहिवीसी असलेल्या नरेश ऊर्फ बाळा रवींद्र सपकाळे (28) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या मयत तरुणाचे मावस भाऊ नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकरनगरातील मोहन टॉकीजजवळ नरेश सपकाळे हा तरुण परीवारासह वास्तव्यास होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर घराशेजारच्या पार्टिशनच्या खोलीत तो झोपायला गेला असता सकाळी पाचच्या सुमारास पत्नी लक्ष्मी यांनी उठून पाहिले असता नरेश याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह आणला. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.

