जळगाव जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे


जळगाव : जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधीत क्षेत्रातील वगळून) हे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जंतुकीकरण करणे या नियमांचे व सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाय
65 वर्षे वयावरील नागरीक, कोविड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षे वयाखालील मुले यांनी घरीच थांबावे, धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती/संस्था/संघटना यांनी याठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणारे कामगार यांनी कोविड-19 ची लागण होऊ नये अथवा प्रसार होऊ नये याकरीता पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता कमीत कमी 6 फूट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, प्रत्येक नागरीक, भेट देणारे व्यक्ती यांनी चेहर्‍यावर मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील, त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, साबणाने वारंवार हात धुवावेत (कमीत कमी 40-60 सेंकद पर्यंत) अथवा हात निर्जंतुक करण्यासाठी अल्कोहोल मिश्रीत सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा (कमीत कमी 20 सेंकद), श्वसनाबाबत शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करण्यात यावे, खोकतांना व शिंकतांना तोंड व नाक झाकणे, शिंकतांना टीश्यु पेपर/हातरुमाल/ हाताच्या कोपर्‍याचा वापर करावा व टीश्यु पेपरची विल्हेवाट योग्यरित्या करावी, आरोग्याबाबत निरीक्षण करावे व आजाराबाबत राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, याठिकाणी थुंकण्यास बंदी राहील, नियमांचे उल्लघंन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, आरेाग्य सेतू अ‍ॅपचे इन्स्टॉलेशन करुन त्याचा वापर करण्यात यावा.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !