25 वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या


जामनेर : तालुक्यातील देवुळगाव गुजरी येथील 25 वर्षीय विवहितेने घरात गळफास लावत आत्महत्या केली. मनीषा सुरेश आवटे (25) असे मयत विवाहितेचे नाव आहे. गोद्री येथील माहेर असणार्‍या मनीषा सुरेश आवटे या विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी तिने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूस कुणालाही जबाबदार न धरता माझ्या पतीचे दुसरे लग्न करून द्यावे असे म्हटले आहे. दरम्यान, मृत्युसमयी मनीषा ही गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे. या आत्महत्येचा पुढील तपास पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहे. मयत मनीष आवटे यांचे पती एस.टी महामंडळात वाहक म्हणून सेवेत कार्यरत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !