मलबार हिलला समुद्रात बुडाल्याने दोघांचा मृत्यू !


मुंबई : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडाल्याने मृत्यू झाला. दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. दोन या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास सेंट्रल मुंबईला नागपाडा येथे राहणारी मुले आपल्या मित्रांसोबत प्रियदर्शनी पार्क येथे गेली होती. 14 ते 15 वयोगटातील या दोन मुलांसोबत त्यांचे तीन मित्र होते. प्रियदर्शनी पार्क येथे गेल्यानंतर मुले पोहण्यासाठी समुद्रात उतरली होती. तिथे बॅरीकेट नसल्याने मुलं सहजपणे आत गेली आणि पाण्यात खेळू लागली. अशी माहिती सूत्रांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !