अमळनेर तालुक्यातील जवानाला वीर मरण
अमळनेर/नाशिक : अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावाचे भूमिपुत्र तसेच नाशिकच्या अंबडमध्ये स्थित गणेश भीमराव सोनवणे (36) यांना जम्मु-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना मंगळवर, 5 रोजी वीर मरण आले. वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर सोनवणे यांची सैन्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अंबड गावातील डीजीपीनगर-2 जवळील कंम्फर्ट झोन सोसायटीतील रहिवासी गणेश सोनवणे हे सैन्यदलात नोकरीवर होते. मंगळवारी त्यांच्या पत्नी सीमा सोनवणे यांना सैन्यदलाच्या कार्यालयातून फोन आला आणि लष्करी अधिकार्यांकडून ‘तुमचे पती एका अपघातात शहिद झाले आहेत’ असे सांगण्यात आले अन् त्यांच्यावर आभाळ फाटले. सुरुवातीला त्यांचा या निरोपावर विश्वासच बसत न्हवता, कारण मंगळवारी सकाळीच गणेश यांनी आपल्या पत्नी, मुलींशी फोनवरुन संवाद साधला होता. गणेश यांच्या पश्चात आई सिंधुबाई, पत्नी सीमा, मुली प्रांजल व हर्षदा असा परीवार आहे.
