नदीत अंघोळीसाठी गेलेले तीन तृतीयपंथीय पाण्यात बुडाले


पारोळ : नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तीन तृतीयपंथीय बुडाले. खराटतारा येथे तानसा नदीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली. वसई-विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत शोध मोहिम राबवण्यास सुरूवात केली आहे. खानिवडे येथे टोलनाका असल्याने या ठिकाणी तृतीपंथीय यांचा नेहमी वावर असतो. गुरुवारी घटस्थापना असल्याने नदीत अंघोळ करून दुर्गापूजा करण्याचे सहा तृतीयपंथींनी ठरवले होते. तानसा नदीत अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले तर तीन बाजूला राहिले, पण खोल पाण्यात गेलेल्या तिघांना पोहता येत नसल्याने ते नदीत बुडाले. तीन साथीदारांनी नदीबाहेर येत तीन सहकारी बुडाले असल्याची माहिती त्यांनी विरार पोलिसांना दिली. अरीका (वय 40), प्राची (23) व सुनीता (27) अशी बुडालेल्या तृतीयपंथींची नावे आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !