तरुणाला चौघांनी केली मारहाण
जळगाव : दवाखान्याच्या निमित्ताने जात असलेल्या एका तरूणाला मेडीकलवर जाणार्या चार तरुणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गोकुळे बबन लोंढे (30, रा.पायधन हॉस्पीटलसमोर, कंजरवाडा) हे वडीलांसह 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता पंचमुखी हनुमान मंदीराजवळील शोभा हॉस्पिटलशेजारी असलेले मेडीकलवर मास्क घेण्यासाठी गेले असता मेडीकलवरील चार अनोळखी तरूणांनी चिडवले. याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर चौघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी अनोळखी चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनील सोनार करीत आहे.
कर्नाटक राज्यातील लूटीचे यावल कनेक्शन : तरुण ताब्यात तर दुसरा पसार

