एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाकडे
मुंबई : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात गेली आहे. एअर इंडियासाठी टाटा समुह व स्पाईसजेटच्यअजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा समुहानं यासाठी सर्वाधिक 18 हजार कोटी रूपयांची बोली लावल्याने तब्बल 68 वर्षांनंतर टाटा समूहाकडे एअर इंडिया कंपनी आली आहे. यापूर्वी एअर इंडिया ही पुन्हा टाटा समुहाकडे जाणार या वृत्ताचं खंडन करण्यात आलं होतं परंतु अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
Tata Sons wins the bid for acquiring national carrier Air India pic.twitter.com/XgAW5YBQMj
— ANI (@ANI) October 8, 2021






कर्जाचा बोजा वाढल्याने एअर इंडिया विक्रीचा निर्णय
कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. सरकारनं यापूर्वी 2018 मध्ये एअर इंडियातील 76 टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही त्यानंतर सरकारनं कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला. अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच 15 सप्टेंबरपर्यंत दोन संभाव्य खरेदीदारांनी आपल्या निविदा दाखल केल्या होत्या. टाटा समुहाद्वारे आपली होल्डिंग कंपनी आणि स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंह आणि अन्य काही जणांनी आपली बोली सादर केली होती. सरकारनं एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती.
पुन्हा एअर इंडिया टाटांकडे
जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली. दुसर्या महायुद्धादरम्यान विमान सेवा बंद करण्यात आली होती. जेव्हा विमानसेवा पुन्हा सुरू झाली, तेव्हा 29 जुलै 1946 रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर, 1947 मध्ये एअर इंडियाचा 49 टक्के सहभाग सरकारने आपल्या ताब्यात घेतला आणि 1953 मध्ये त्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


