एम्को कंपनीतून 73 हजारांचा मुद्देमाल लंपास
जळगाव : तालुक्यातील कंडारी फाटा वाघुर धरणाजवळील एम्को प्रायव्हेट लिमीटेड (सिद्दार्थ इंडस्ट्रीज) या कंपनीतील इलेक्ट्रीक मोटर्स व इतर साहित्य असा एकुण 73 हजाराचा मुद्देमाला चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या विरोधात गुन्हा दाखल
एम्को प्रायव्हेट लिमीटेड (सिद्धार्थ इंडस्ट्रीज) या कंपनीचा ताबा एनसीएलटी न्यायालयाकडून लिक्विडेटर म्हणून सुन्द्रेश भट यांच्याकडे आला आहे. पब्लिक सिक्युरिटी अॅण्ड प्लेसमेंट या फर्मला या कंपनीच्या सिक्युरिटीचे कंत्राट देण्यात आले आहे. या सिक्युरिटी फर्ममधे काम करणा-या सिक्युरिटी गार्ड व सुपरवायझर अशा सर्वांनी मिळून त्याच्या कब्जातील मालमत्तेची संगनमताने चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. इलेक्ट्रीक मोटारी व अॅल्युमिनीयम व्हिल असा एकूण 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल 5 जानेवारी 2021 ते 6 ऑक्टोबर 2021 दरम्यान चोरी झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी अनिलकुमार श्रीमुंशीराम वर्मा (जिल्हा भिवानी, हरीयाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार चंद्रभान पटेल, अशोक चंद्रभान पटेल (दोघे रा.बरहज, जि.देवरीया बेलवा उत्तरप्रदेश), प्रितमकुमार सदानंद मौर्य (रा.चुहिया, जि.देवरीया उत्तर प्रदेश), शशीकांत सतीराम (रा.बढाईपूर सिकडोहर, आंबेडकर नगर, उत्तरप्रदेश), सुग्रीव कुमार रामप्रसाद (रा.मैनी पोस्ट खंबा रुधौनी खुर्द, उत्तरप्रदेश), तारकेश्वर स्वामीनाथ पटेल (रा.देवरीया उत्तर प्रदेश), रजनीश त्रिभुवन पटेल (रा.चंद्रभागा चाळ, बोनकोडे श्रमिक कोपरखैराणे, ठाणे), धरमेंदर दोलीचंद सैनी (रा.ओल मथुरा, उत्तरप्रदेश) अशा आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत.

