बलात्कारानंतर महिलेचे अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत खंडणी उकळणारा आरोपी जाळ्यात
पिंपरी : महिलेवर बलात्कार करत तीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढून ते महिलेच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तीन लाखांची रक्कम उकळणार्या आरोपीला पोलिसांनी अटक ेली आहे. शुभम अशोक दरंदले (25, रा.सोनाई, ता.नेवासा, जि.अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून त्यास अटक करण्यात आली. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने गुरुवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
बलात्कार करून व्हिडिओ व्हायरलची धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला त्याच्या भाड्याच्या फ्लॅटवर नेऊन तिथून बाहेर जाण्यास अटकाव करून बळजबरीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंध करतानाच्या वेळी आरोपीने महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. ते फोटो महिलेच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून महिलेकडून तीन लाख रुपये घेतले तसेच महिलेला अश्लील भाषेत बोलून तिला मेसेज करून तिचा विनयभंग केला. ही घटना 5 मे 2019 ते जुलै 2020 या कालावधीत म्हाळुंगे गावठाण, ता.मुळशी येथे घडली.
