ड्रायफ्रुटच्या दुकानातून चोरट्यांनी दोन हजारांची रोकड लांबवली


चाळीसगाव : शहरातील अष्टभुजा व्यापारी संकुलातील नवकार ड्रायफ्रुट नावाच्या दुकानातील गल्ल्यातून चोरट्यांनी दोन हजार 100 रुपयांची रोकड लांबवली. 7 ते 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. हुकुमचंद चांदमल खाबिया (60, रा.हनुमान वाडी, नवकार बंगला, स्टेशन रोड, चाळीसगाव) यांचे शहरातील अष्टभुजा व्यापारी संकुलात नवकार ड्रायफ्रूट्स नावाचे दुकान आहे. 7 ऑक्टोबर रात्री 9 ते 8 ऑक्टोबर पहाटे सहा वाजेच्या दरम्यान बंद दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील 2 हजार 100 रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार पहाटे सहा वाजता उघडकीला आल्याने हुकुमचंद खाबिया यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !