विवाहित महिला डॉक्टरांचे नग्न व्हिडिओ व्हायरल : तरुणाविरोधात गुन्हा


पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून डॉक्टर असलेल्या तरुणीशी जवळीक वाढवत नग्न व्हिडिओचे स्क्रीन रेकॉर्ड करून व्हायरल करणार्‍या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी प्रणव अरविंद पांचाळ (रा. अटलादरा, जि. वडोदरा, गुजरात) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पीडीत डॉक्टरांच्या पतीलाच पाठवले व्हिडिओ
36 वर्षीय पीडित महिला डॉक्टरांनी शुक्रवार, 8 रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रणव पांचाळ याने फिर्यादी महिला डॉक्टरांशी लग्न करण्याचा बहाणा करीत त्याच्या मोबाइलवरून फिर्यादीला व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलवरून बोलण्यास भाग पाडले शिवाय कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड तयार करून नग्न फोटो फिर्यादीच्या मेलआयडीवर व्हायरल केले शिवाय फर्यादीच्या पतीच्या मोबाइलवर हा व्हिडीओ पाठविला. तसेच त्याचा व्हिडिओ कॉल रीसीव्ह करण्यासाठी फिर्यादीशी मोबाइलवर वारंवार संपर्क केला. फिर्यादीच्या नातेवाइकांना फोटो व्हायरल करण्याच्या धमकी दिली. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य व बदनामी करून फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, फिर्यादी डॉक्टर महिलेचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !