बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर : 52 हजारांचा मुद्देमाल लंपास


पहूर : नांदेड तालुक्यातील गोंदेगाव येथील बंद घरातून अज्ञात चोरट्याने 52 हजार रुपयांची रोकड व काही वस्तू लंपास केल्याचे उघडकीला आले. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्नील सुरेश मसकर (20, रा.गोंदेगाव, ता.जामनेर, जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. दरम्यान 18 सप्टेंबर दुपारी 12 ते 6 ऑक्टोंबर सकाळी 9 वाजेच्या ते घराचे कुलूप लावून बकी, ता. बोदवड येथे कामानिमित्त गावाला गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील 50 हजार रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपये किंमतीच्या वस्तू असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी शुक्रवार, 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !