पतीच्या शोधार्थ निघालेल्या विवाहितेवर सामूहिक अत्याचार


नवी दिल्ली : देशात महिलांवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. भांडण करून घराबाहेर पडलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी 25 वर्षीय विवाहिता बाहेर पडल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना पश्चिम बंगालच्या वर्धमान शहरात घडली. महिलेवर वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पोलिसांकडून आरोपींचा शोध
गुरुवारी सकाळी वर्धमान हॉस्पिटलजवळ राज कॉलेजच्या गेटसमोर या महिलेला फुटपाथवर गंभीर अवस्थेत काही दुकानदारांनी पाहिले. त्यांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली. तोवर या व्यापार्‍यांनी आपल्या दुकानात काम करणार्‍या महिलांच्या मदतीने तिला वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती केले. पीडितेने सांगितले की, तिचा पती भांडण करून घर सोडून निघून गेला होता. त्याच्या शोधासाठी ती वर्धमानला आली होती. तिचा पती वर्धमानमध्ये एका फॅक्टरीमध्ये काम करतो. बुधवारी सायंकाळी ती त्याच्या शोधासाठी शहरात दाखल झाली होती. तिने पती काम करत असलेली फॅक्टरी गाठली परंतु तो तिथे सापडला नाही. यामुळे थकून भागून ही पीडिता वर्धमान स्टेशन भागात बसली असताना टोटो रीक्षा (ई रिक्षा) आली. व त्यातील सहा नराधमांनी विवाहितेला बळजबरीने उचलून नेले. अज्ञातस्थळी महिलेवर सामूहिक बलात्कार केला व नंतर धावत्या टोटोमधून बाहेर ढकलून देत पळ काढला. पोलिसांनी या घटनेनंतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !