भोजे गावातील 30 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आमहत्या


पाचोरा : तालुक्यातील भोजे येथील एका 30 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. योगेश संतोष पवार (30) असे मयताचे नाव आहे. शनिवार, 9 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ही घटा घडली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. ही घटना घडली तेव्हा आई व वडिल बाहेर गेले होते. काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर त्यांना योगेश हा घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. डिगंबर थोरात हे करीत आहे. मयत योगेश पवार यांच्या पश्‍चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परीवार आहे. योगेश पवार याने आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !