कोटेशन पद्धत बंद करून ई निविदा प्रसिद्ध करावी
वंचित बहुजन कंत्राटदाराचे महानिर्मिती मुख्य अभियंत्यांना निवेदन
दीपनगर : दीपनगर वीज प्रकल्पातील स्थानिक कंत्राटदारांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत मुख्य अभियंता विजय राठोड यांना प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शाखेने निवेदन दिले. या निवेदनाचा आशय असा की, जी.एस.टी.ची कपात बिलातून करण्यात यावी अथवा दंडाच्या रक्कमेसह बिल कंत्राटदाराला देण्यात यावे, विविध कामांची कोटेशन पध्दत बंद करून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ई-निविदा काढण्यात यावी व त्यामध्ये जास्तीत-जास्त स्थानिक प्रकल्पग्रस्त गावातील कंत्राटदाराला प्राधान्य देण्यात यावे, ई निविदा भरताना काही कंत्राटदार त्रृटींची पूर्तता करीत नाही अथवा चुकीने दर कमी/जास्त टाकला त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही, असे जे कंत्राटदार लिहुू देतात त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व निविदा प्रकीयेचा सर्व खर्च त्यांच्याकडून वसुल करण्यात यावा, निविदा उघडल्यावर जास्तीत-जास्त एका महिन्याच्या आत कामांचा आदेश देण्यात यावा, सर्व मोठ्या निविदा रद्द करून छोट्या निविदा करण्यात याव्या जेणे करून जास्तीत-जास्त स्थानिक कंत्राटदार सहभागी होतील व महानिर्मिती कंपनीस फायदा होईल अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
निवेदन शाखाध्यक्ष रामचंद्र तायडे यांच्या स्वाक्षरीने प्रदेश सचिव प्रकाश तायडे, उपाध्यक्ष मन्साराम कोळी, सहसचिव नारायण झटके, संघटक उस्मानखा पठाण, कोषाध्यक्ष संतोष तेलंग, तोहसीफ पठाण, राजगोपाल तेलंग, सुरेश टाक, संजय रावलकर, सुरेंद्रसिंग ठाकूर, संजय अडकमोल, हरपालसिंग संसोये, सैय्यद मुमताज, संदीप पाटील, जगदीश तराळ, रवींद्र सरदार, सल्लागार आर.आर.आव्हाड आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.



