कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी वात्सल्य समिती व लोक संघर्ष मोर्चा कटीबध्द : प्रतिभा शिंदे


चाळीसगाव : चाळीसगाव तहसीलमध्ये वात्सल्य समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अमोल मोरे यांच्या दालनात लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी चाळीसगाव तालुक्यात कोरोनामुळे पती, मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्व्हे करावा, अश्या निराधार महिलांना तत्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, निराधार पेन्शन योजना, कुटुंब सहाय्य योजनेंतर्गत 20 हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत, ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यू नंतर कागदपत्र उपलब्ध नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत, एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबधित विभागाच्या योजना मिळवून देण्याची शिफारस वात्सल्य समितीने करावी, समृध्द गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा, ज्या महिलांच्या कडे शेती आहे त्यांना शेती पूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळाव, सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सर्वांना 50 हजार रुपये अनुदान तत्काळ देण्यात यावे, तालुक्यात एक पालक गमावलेल्या मुलांना तत्काळ बाल संगोपन अनुदान महिना 1250 रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ 5 लाख रुपयाची मदत देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला लोकसंंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभा शिंदे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सुचित्रा पाटील, सविता राजपूत, शशांक अहिरे, राहुल राठोड, लोकसंघर्ष मोर्चाच्या तेजस्विता जाधव, कलिंदर तडवी, लोकसंंघर्ष मोर्चा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ माळी यांच्या सह कोरोना मुळे एकल झालेल्या महिला व चाळीसगाव तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. प्रसंगी तहसीलदार मोरे यांनी गावनिहाय सर्व्हे आठ दिवसात पूर्ण करण्याचे व सर्वांना रेशन व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देत पुढील दर 15 दिवसातून एकदा मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !