अमळनेरात बंद घरातून चोरट्यांनी टीव्ही लांबवला
अमळनेर : शहरातील जीवन ज्योती कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरातील 35 हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही चोरट्याने लांबवला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मानसी राजेंद्र साळुंखे (25, रा.संस्कृती बंगला, जीवनज्योती कॉलनी, अमळनेर) या आपल्या कुटुंबियांसह राहतात. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान त्या घराला कुलूप लावून एका नातेवाईकांकडे गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरातील 35 हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. याप्रकरणी मानसी साळुंके यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार बापू साळुंखे करीत आहेत.

