पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीतून घातक शस्त्रांसह अटक


नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला एकके 47 बंदूक व दारुगोळ्यासह अटक केली. पूर्व दिल्लीतील शास्त्री नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. मोहम्मद अशरफ अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अशरफ अली मौलाना म्हणून 10 वर्ष भारतात राहत होता. हा दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी असून, तो मोहम्मद अशरफ अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. पोलिसांनी दहशतवाद्याकडून एके 47, काडतूस आणि ग्रेनेड जप्त केले आहेत. याशिवाय, बनावट कागदपत्रांच्या मदतीने दहशतवाद्याने बनवलेले भारताचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना स्वतः विशेष कक्षाच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते. अस्थाना म्हणाले, सणासुदीच्या अगोदर विशेष कक्षाने दहशतवादाची एक मोठा कट उधळून लावला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !