अत्याचारातून अल्पवयीन पीडीता गर्भवती : आरोपीविरोधात गुन्हा
जव्हार : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत सतत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ही मुलगी गर्भवती राहिली व तिने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सोमवारी एका व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. व्हार तालुक्यातील देहरे पैकी चिरेचापाडा येथे ही घटना घडली. वडोली येथील शैलेश लक्ष्मण आचारी (20) या तरुणाने पीडित मुलीला शाळेत असतांना जवळीक साधत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेत आरोपीने तिच्या सोबत जून 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती करत तिने सातव्या महिन्यातच एका नवजात बालकाला जन्म दिला. आरोपीविरुद्ध पोक्सो तथा लैंगिक अप्राधापासून बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करीत आहेत.
