हाणामारीत पोटात धारदार शस्त्र खुपसल्याने युवकाचा जागीच मृत्यू
नाशिक : भर चौकात दोन फिरस्त्यांमध्ये हाणामार्या झाल्यानंतर एकाने धारधार हत्यार दुसर्याच्या पोटात खुपसल्याने 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. नितीन उर्फ सोनू बालाजी गायकवाड (30, रा.भारतनगर, वडाळारोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दुधबाजार पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर सोमवार, 18 रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
गुन्हेगारीने डोके काढले वर
पोलीस चौकीपासून काही मीटर अंतरावर सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास खोदलेल्या मुख्य रस्त्यावर दोन फिरस्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी सुरु झाली. यावेळी अज्ञात संशयीत आरोपीने नितीनला धारधार शस्त्रासे भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला. परीसरातील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांपैकी काही कॅमेर्यांमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या फुटेजच्या सहाय्याने भद्रकाली पोलीस व मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून समांतर तपासाला गती देण्यात आली.

