नगर मनपाचे लेखाधिकारी प्रवीण मानकर एसीबीच्या जाळ्यात


अहमदनगर : मनपातील मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (52, रा. दिल्ली गेट, नगर) यांना एसीबीच्या पथकाने 20 हजारांच्या लाच मागणी प्रकरणी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली. एका ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार व त्याच्या मावसभावाने ठेकेदार म्हणून नगर मनपाची काही कामे केली होती. त्यांची बिले मंजूर करून तक्रारदाराला चेक देण्याच्या मोबदल्यात मुख्य मानकर यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने नाशिक एसीबीच्या पथकाने कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !