अडीच हजारांची लाच भोवली : वीज कंपनीचा टेक्निशियन एसीबीच्या जाळ्यात


लातूर : वीज जाेडणीच्या कामासाठी २ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारताना वीज कंपनीच्या टेक्निशियनला किसीभी च्या पथकाने अटक केल्यानंतर वीज कंपनीतील लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. रहिम पापामियाॅ शेख (४७) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लातूर येथील पथकाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली. उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील वीज कंपनीत टेक्निशियन या पदावर रहीम पापामियाॅ शेख (४७) कार्यरत आहेत. तक्रारदाराने वीज मीटरसाठी ऑनलाईन अर्ज केलेला हाेता. ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने वीज जाेडणीसाठी सर्व कागदपत्र उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करुन, त्यामध्ये कसलीही त्रुटी न काढता मदत करताे, असे तक्रारदाला सांगितले. वीजजाेडणी देण्याच्या कामासाठी २ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी हाळी हंडरगुळी येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून २ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना रहिम पापामियाॅ शेख याला पथकाने रंगेहात अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !