नागपूर हादरले : 24 तासात दोघांचे निर्घृण खून
नागपूर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे गुरुवारपासून तीन दिवसांसाठी विदर्भ दौर्यावर आले असतानाच गुन्हेगारांनी डोके वर काढत दोन हत्या करून गृहमंत्र्यांना सलामी दिल्याने उपराजधानीत मोठी खळबळ उडाली.
24 तासात दोघांचा खून
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुरली किशन सोनखसरी (28, रा.दीपटी सिग्नल, बाजार चौक) यांचा पोटात चाकू मारून आरोपी भारत राजू हिरवानी (18) याने खून केला. मृतक सोनखसरी आणि आरोपी शेजारी आहेत तर हिरवानीच्या घरी भांडण सुरू असल्याने ते सोडविण्यासाठी सोनखसरी मध्ये पडल्याने भारत हिरवानीने बापाला सोडून सोनखसरी सोबत वाद घातला आणि त्याच्या पोटात चाकू मारून त्याची हत्या केली. दरम्यान, दुसर्या एका घटनेत सात गुन्हेगारांनी एका गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना घडली.

