ज्यूसमधून गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार
पुणे : पुण्यात राहणार्या एका तरुणीला तिच्या मित्राने ज्यूसमधून गुंगीचे औषध देत बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी अक्षय कदम (रा.आंबेगाव, पुणे) याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडे 28 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. आरोपी अक्षय कदमची या तरुणीशी ओळख असून त्याने 31 जुलै रोजी तरुणीला त्याच्या फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी तिला गुंगीचे औषध टाकून ज्यूस पिण्यास दिला. ज्यूस पिल्यानंतर तरुणीला गुंगी आल्यानंतर आरोपीने बळजबरीने तिच्यावर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिचा पॉर्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली असता त्याने लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.
