अनैतिक संबंधात पतीचा अडसर : प्रियकराच्या मदतीने खून ; दोघांविरोधात गुन्हा


औरंगाबाद : पिसादेवी गावाच्या पुलाखाली रामचंद्र रमेश जायभाये (रा. कुंभेफळ, जि. बुलडाणा, ह. मु. आईसाहेबनगर, पिसादेवी रोड, हर्सूल) यांचा मृतदेह आढळला होता. रामचंद्रच्या पत्नीचे त्यांचा मित्र गणेश रघुनाथ फरकाडे (रा.बनकिन्होळा, ता. सिल्लोड) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे रामचंद्र यांस दारूचे व्यसन लागले होते. या संबंधात अडसर ठरत असल्यामुळेच रामचंद्र यांचा खून मनीषा व तिचा प्रियकर गणेश या दोघांनी केला, अशी फिर्याद मृताचा भाऊ कृष्णा जायभाये यांनी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला असल्याच्या आरोपानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या चौकशीला वेग दिला आहे.

अनैतिक संबंधातून खुनाचा संशय
पिसादेवी गावाच्या पुलाखालून वाहणार्‍या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी काही नागरीकांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांना कळविले. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन जाधव यांनी सहकार्‍यांसह मृतदेह ताब्यात घेतला असता, मृताच्या खिशात आधारकार्ड आढळले. ही माहिती मृताच्या भावाला देण्यात आल्यानंतर कुंभेफळ येथून ते आल्यानंतर मृताची ओळख पटली. मृत रामचंद्र यांच्या मानेवर मोठी जखम आहे तसेच गळ्यावर अनेक जखमा दिसून आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !