अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच विवाह : अभियंता विवाहितेची आत्महत्या


औरंगाबाद : आठ महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुण विवाहितेने आत्महत्या केली. मेघना अंकुश सूर्यवंशी (23) असे मयत विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी रात्री 7 वाजेच्या सुुमारास ही घटना घडली. चिकलठाणा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत त्या नोकरीला होत्या.

आठ महिन्यांपूर्वीच विवाह
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मेघना हिचा अंकुश सूर्यवंशी याच्यासोबत 16 फेब्रुवारी 2021 रोजी विवाह झाला होता. अंकुश हा वाळूज एमआयडीसीत एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनअर म्हणून नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसातच या दाम्प्त्यामध्ये वाद सुरु झाले. गुरूवारी रात्री 7 वाजता अंकुश सूर्यवंशी घरी आला तेव्हा त्यास मेघना यांनी सिलिंग फॅनला साडीने गळफास घेतल्याचे दिसले. संशयीत पतीविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह थेट वेदांतनगर पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला. रात्री आठच्या सुमारास वरीष्ठ निरीक्षक गणपत दराडे यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले. पतीवर तपास दरम्यान गुन्हा नोंदविण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन गेले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार ए.एच. अहिरे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !