साईल यांनी कोर्टात म्हणणे मांडावे : एनसीबी


मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची सेटलमेंट झाल्याचा दावा एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने केला होता. या संदर्भात प्रतिज्ञापत्रं दाखल करीत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते शिवाय त्यांचा या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी दावा केला होता. त्यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. आता त्यांच्या याच आरोपांवर एनसीबीने स्पष्टीकरण दिले आहे. एनसीबीने प्रसिद्ध पत्रक जारी करत भूमिका मांडली आहे. यामध्ये एनसीबीने साईल यांना कोर्टात आपलं म्हणणं मांडण्याचा सल्ला दिला आहे.

न्यायालयात मांडावे मत
एनसीबीचे अधिकारी मुठा अशोक जैन यांनी हे प्रसिद्धी पत्रक माध्यमांना दिले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणावर सध्या न्यायालयात खटला सुरू आहे तसेच या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईल यांना काही मत मांडायचं होतं तर त्यांनी सोशल मीडिया ऐवजी न्यायालयात मांडायला हवे होतं. त्यांनी सोशल मीडियावर काही लोकांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडण केलं आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी आणि तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या डायरेक्टरांकडे पाठवत असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं एनीसीबीच्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !