फायनान्स कर्मचार्‍याला मारहाण करीत 35 हजारांची रोकड लांबवली


जामनेर : वसुली करून जामनेरकडे येणार्‍या फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍याला मारहाण करीत 35 हजारांची रोकड लांबवण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कविराज प्रभाकर हरणे (24, शंकरनगर) हे फिनकेअर स्मॉल फायनान्स या खाजगी वित्तीय संस्थेत वसुली कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांच्याकडे तालुक्यातील बचतगटांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीचे काम आहे. या अनुषंगाने कविराज हे खडकी येथून वसुली करून जामनेरकडे येत असताना गावापासून दोन किलोमीटर अंतरावरच दुचाकी अडवून त्यांना जबर मारहाण केली. त्यांच्याकडील 34 हजार 380 रुपयांची रोकड, कंपनीचा एक टॅब, पावती पुस्तके असा मुद्देमाल हिसकावून नेला. याप्रकरणी कविराज यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !