भरधाव दोन ट्रक धडकल्या : चालकाचा जागीच मृत्यू


पैठण : दोन ट्रक समोर समोर धडकून झालेल्या अपघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी पैठण-पाचोड रोडवर आखतवाडा गावाजवळ घडला. दुसर्‍या चालकास उपचारासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

समोरा-समोर ट्रक धडकल्याने अपघात
पैठण-पाचोड रोडवर आखतवाडा गावाजवळ असलेल्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या पुलाच्या वळणावर बुधवारी सायंकाळी दोन भरधाव ट्रक समोरासमोर भिडल्या. अपघाताची भीषणता इतकी होती की, एका ट्रकची समोरची कॅबीन निखळलीी तर दुसरा ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. या अपघातात आयशर ट्रक (क्र जीजे 12 बीवाय 0178) चा चालक मोहनलाल मिश्रीलाल फुलवारी (32, रा.भारतनगर गांधीधाम कच्छ गुजरात) हा जागीच ठार झाला. ट्रक (क्र. एम एच 16 सीसी 9921) चा चालक राजेंद्र रावसाहेब सुळ (27, रा. खेड, ता.कर्जत, जि.अहमदनगर) हा गंभीर जखमी झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !