चुंचाळेतील बेपत्ता भावंडांच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल
यावल : तालुक्यातील चुंचाळे शिवारातून बुधवारी दुपारी भावंडे बेपत्ता झाल्याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंचाळे येथील गायरान परीसरातील रहिवासी रवींद्र सावळे आणि उज्ज्वला सावळे या दाम्पत्याची रीतेश सावळे (वय 5) हितेश सावळे (वय 6) ही मुले बेपत्ता झाल्याप्रकरणी यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी आपल्या आई-वडिलांच्या सोबत ही दोन्ही मुले शेतात गेली असताना बेपत्ता झाली. चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा दुपारपासून शोध घेण्यात येत असला तरी ते मिळून न आल्याने सावळे दाम्पत्य धास्तावले आहे.
यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल
बुधवारी रात्री पर्यंत चिमुकल्यांचा शोध न लागल्याने बालकांचे वडील रवींद्र मधुकर सावळे (35, रा.चुंचाळे, ता.यावल) यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व सहा.पोलीस उपनिरीक्षक विजय पाचपोळे व सहकारी करीत आहेत.



