विधवा महिलेवर नराधमाचा बलात्कार : पोलिसांनी भिवंडीत आवळल्या आरोपीच्या मुसक्या


भिवंडी : 26 वर्षीय विधवा पीडितेवर बळजबरीने बलात्कार करून पसार झालेल्या आरोपीला शांतीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. सलमान मो. शाह (26 वर्ष ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील सलोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका 26 वर्षीय पीडित विधवा महिलेवर नराधम सलमान याने अत्याचार केला होता. आरोपी व पीडित विधवा महिला एकाच परिसरात रहात असल्याने पीडितेशी त्याची ओळख होती. त्यातच लॉकडाऊनपूर्वी पीडीतेच्या पतीचे निधन झाल्याने याचा फायदा घेत आरोपी सलमानने तिच्याशी जवळीत साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

ठार मारण्याची धमकी देत केला अत्याचार
दोघांमध्ये वर्षभर प्रेमसंबंध सुरू असतानाच गेल्यावर्षी तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार करून आरोपी सलमान पसार झाला होता. त्यावेळी याप्रकरणी सलोन पोलीस ठाण्यात सलमान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत युपी पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. युपीमधील सलोन पोलिसांना 2 वर्षांपासून आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यातच सलोन पोलिसांना काही दिवसापूर्वीच आरोपी सलमानचा मोबाईल नंबर मिळाला असता, त्याचे मोबाईल लोकेशन भिवंडीत येत असल्याचे आढळून आले. त्यांनतर भिवंडी पोलिसांशी संपर्क करून आरोपीचा नंबर व वर्णन शांतीनगर पोलिसांना दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !