सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार : महिलेसह साथीदाराला दहा वर्ष शिक्षा
नवी दिल्ली : सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणार्या 45 वर्षीय महिला आणि तिच्या साथीदाराला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्हा कोर्टाने हा निकाल देताना दोन्ही आरोपींना 2-2 हजारांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने महिलेला ही शिक्षा डीएनए टेस्टच्या आधारावर दिली आहे.
2014 मध्ये दाखल होती तक्रार
महिलेने ऑगस्ट 2014 मध्ये पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात गुन्हा दाखलही केला होता. पोलिसांनी चौकशी केली आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांचीही चौकशी केली. आरोपींनी पोलिसांकडे डीएनए टेस्टची मागणी केली होती. याला पोलिसांनी परवानगी दिली होती. रिपोर्टमधून समोर आलं की, महिलेसोबत आरोपींचा डीएनए मॅच होत नव्हता. दुसरीकडे पोलिसांना गोपाल नावाच्या व्यक्तीवर संश़य आला. पोलिसांनी गोपाल आणि एका इतर व्यक्तीची डीएनए टेस्ट केली. ही टेस्ट महिलेसोबत मॅच झाली. यानंतर महिला आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी कोर्टाने दोन्ही आरोपीना 10 वर्षाची शिक्षा सुनावली.



